शिरपूर येथील पटेल इंग्लिश स्कूलची राज्यस्तरावर भरारी

0

शिरपूर (प्रतिनिधी) – येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडिअम स्कूलच्या क्रिकेट संघाने शालेय क्रिकेट स्पर्धेत नाशिक विभागात अव्वल स्थान पटकावून सलग तिसर्‍यांदा संघाने राज्यस्तरावर भरारी घेऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2016-17 साठी 17 वर्षे आतील मुलांच्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी आर.सी.पटेल इंग्लिश मेडिअम स्कूलच्या क्रिकेट संघाने धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करुन शाळेच्या संघाने नंदुरबार येथे संपन्न झालेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत दैदिप्यमान यश पटकावले. या स्पर्धेत नाशिक ग्रामीण, नाशिक शहरी, जळगाव ग्रामीण, जळगाव शहरी, नंदुरबार ग्रामीण, धुळे शहरी व मालगाव शहरी अशा बलाढ्य क्रिकेट संघांना पराभूत करुन नाशिक विभागात अव्वल स्थान पटकावले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
या यशासाठी कर्णधार दानेश पटेल, आनंद जगताप, प्रशांत ढोले, दुष्यंत पाटील, कौस्तुभ हडप, कादीर तुर्क, अरविंद गुप्ता, ॠषिकेश सोनवणे, दिपराज भोई, केतन धर्माधिकारी, भूवन सुर्यवंशी, बाल्मिकी सिंग, ज्ञानेश महाजन, ॠषिकेश पाटील, आशय चौधरी, मोक्षद जैन या खेळाडूंनी कामगिरी बजावली. त्यांचे आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्ष भुपेश पटेल, राजगोपाल भंडारी आदींनी कौतुक केले आहे.