शिरपूर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी प्रसन्न जैन

0

शिरपूर । शिरपूर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी प्रसन्न जयराज जैन यांची पुनश्च सलग दुस-यांदा व उपाध्यक्षपदावर काशिनाथ सोमा माळी यांची माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली आहे. शिरपूर मर्चंट बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी मंगळवार 14 मार्च रोजी सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांच्या अध्यक्षते खाली सभा घेण्यात आली होती. या सभेत नवनिर्वाचित संचालकांमधून सत्ताधारी गटातर्फे चेअरमनपदासाठी प्रसन्न जैन व व्हाईस चेअरमन पदासाठी काशिनाथ माळी यांचा एकमेव निर्धारीत वेळेत अर्ज दाखल झाला. यावेळी प्रसन्न जैन, काशिनाथ महाजन, राजेंद्र पंडीत, नवनित राखेचा, साहेबराव महाजन, रामचंद्र ठाकरे, विनोद चावडा, मनोज अग्रवाल, मुकेश अग्रवाल, पूनम भंडारी हे सर्व 10 संचालक, बँकेचे अधिक ारी व कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध
विरोधी गटातर्फे तुषार रंधे, किरण दलाल, केवलसिंग राजपूत, महेश लोहार, स्मिता कोठारी हे सर्व पाचही संचालक अनुपस्थित होते. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी प्रसन्न जैन व उपाध्यक्षपदासाठी काशिनाथ माळी यांचेच अर्ज दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. जनकव्हीला, आमदार निवासस्थानी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी संचालकांची बैठक घेवून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नावे जाहीर केली होती.