Private Advt

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई ; गांजा शेती केली उध्वस्त

३६० किलो गांजा झाडे जप्त

 

 

तालुक्यात शनिवारी शिरपूर तालुका पोलिसांनी वनजमीन क्षेत्रात कारवाई करीत लाकड्या हनुमान शिवारात कापूस पिकात लागवड केलेली गांजा शेती उद्धवस्त केली असून 7 लाख 20 हजार रुपये किमतीची 360 किलो वजनाची गांजा झाडे जप्त केली असून शेत जमीन कसणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकासह शनिवारी दुपारी दीड दोन च्या सुमारास तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात प्रदीप वेस्ता पावरा रा. लाकडया हनुमान हा कसत असलेल्या वनजमीन क्षेत्रावर छापा टाकला असता सदर शेतात कापूस पिकाच्या आडोश्याला अंदाजे ३ ते ५ फुटापर्यंत वाढलेली गांजा सदृश झाडे आढळुन आल्याने कारवाई करण्यात आली.कारवाई ची चाहूल लागल्याने शेत धारक प्रदीप वेस्ता पावरा हा फरार झाला.सदर शेतातील गांजा सदृश झाडे उपटून 7 लाख 20 हजार रुपये किमतीची 360 किलो गांजा झाडे जप्त केली

याप्रकरणी पोहेकॉ जाकीर शेख यांनी फियार्द वरुन गुन्हा दाखल झाला असुन तपास पोसई भिकाजी पाटील करीत आहेत

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,शिरपूर उप विभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ,सीमा तपासणी नाका हाडाखेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सावन पाटील, पीएसआय नरेंद्र खैरनार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नियाज शेख,लक्ष्मण गवळी, पोहेकॉ/ ठाकुर,गंगाराम सोनवणे, मंगेश मोरे, सईद शेख, पोना आरीफ पठाण, पोकॉ मुकेश पावरा,पोकॉ प्रकाश भिल,पोकॉ मोरे व चालक पोकॉ मनोज पाटील व RCB पथकाचे 10 कर्मचारी यांनी केली.