शिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू

0

शिरपूर: येथील प्रसिद्ध उद्योगपती व शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे बांधकाम सभापती तसेच आ.अमरिश भाई पटेल यांचे पुतणे तपणभाई मुकेशभाई पटेल यांचा  अपघाती मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला.
सावळदे निम्स कॅम्पसमधून  एम.एच.१८ एएक्स८ मर्सिडीज कारने घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरूध्द दिशेला जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण आहे की
गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला आणण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ५ वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात अंत्यसंस्कार होणार आहे.
शिवसेनेचे माजी खासदार स्व मुकेशभाई पटेल यांचा तो मुलगा होता. माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा तो पुतण्या होता.

Copy