शिरपूर दूचाकी अपघात एक ठार

शिरपूर। शिरपूरकडून दोघे दूचाकीने नागेश्वर बंगला येथे परत जात असतांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील अजंदे शिवारात चोपडा फाट्यावर दूचाकी घसरल्याने अपघात झाला. या घटनेत एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात तालुक्यातील नागेश्वर बंगला येथील किरण मच्छिंद्र नगराळे हा जागीच ठार झाला तर शांताराम सोमा ठेलारी हा जखमी झाला. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डॉ.हिरेन पवार यांनी किरण मच्छिंद्र नगराळे यास तपासणी करून मयत घोषित केले. तसेच शांताराम ठेलारी याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वार्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून वाहन अपघात व अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

 

Copy