शिरपूर तालुक्यात कोरोनाचे एकाच दिवशी दोन बळी

0

शिरपूर: तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय आणि शिरपूर शहरातील काझीनगर येथील ६२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

शिरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १० एकाचा ही आतापर्यंत मृत्यू झाला नव्हता.दोन रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परत आले आहे.तर बाकी रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहे परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाने खळबळ उडवून दिली आहे.दोघे रुग्ण दोन-तीन दिवसांपूर्वीच धुळे येथे उपचारासाठी दवाखान्यात उपचार्थ दाखल करण्यात आले होते.दरम्यान आज उपचारांती दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

तालुक्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे,दरम्यान तालुक्यातील लोकांनी खबरदारी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.