शिरपूर एज्युकेशन सोसायटीतर्फे एक दिवसाचे वेतन सीएम, पीएम केअर फंडात जमा

0

शिरपूर: कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. यामुळे महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यानुसार महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट यांच्यावतीने एकत्रितरित्या गोळा करण्यात आलेली रक्कम २३ लाख ७८ हजार ५१४ रुपयांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात आला.
संस्थेचे अनुदानित कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन १२,७८,५१४ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात आले. त्यापैकी संस्थेच्या दोन महाविद्यालयांचे एकूण २,४२,४७८ रुपये रोख स्वरूपात शासन आदेशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये या आधीच जमा करण्यात आले आहेत. तसेच संस्थेच्या विना अनुदानित कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन १० लाख ३९ हजार ९३८ व संस्थेतर्फे ६० हजार ६२ असे ११ लाख रुपये निधी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आर.टी.जी.एस.(RTGS) द्वारे संस्थेमार्फत २३ लाख ७८ हजार ५१४ मोठा निधी जमा करण्यात आला. तसे पत्र तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आर.सी. पटेल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्‍थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होते.
यापूर्वी आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे केरळ पूरग्रस्तांना २८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. याप्रमाणे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रयत्नशील असते.