शिरपूरात भाडेकर्‍याने केला घरमालकीणचा विनयभंग

0

शिरपूर । शिरपूर शहरातील एका काँलनी परीसरातील भाड्याने दिलेले घर खाली करण्याचे घर मालकिणने सांगितल्याचा राग आल्याने भाङेकरुने विनयभंग केल्याची घटना घङली याबाबत पोलिस ठाण्यात भाङेकरु पती – पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील पित्रेश्वर काँलनीत एका 32 वर्षीय महिलेचे घर विश्वासराव गुलाबराव देशमुख यांना भाड्याने दिलेले आहे ते घर खाली करण्याचे त्या महिलेने सांगितले. याचा राग देशमुख यांना आल्याने त्यांनी त्या महिलेशी वाद घालुनतिचा हात धरुन ढकलुन देत विनयभंग केला तर देशमुख यांच्या पत्नीने तिला शिवीगाळ केली. याबाबत सदर महिलेने भाङेकरु पती पत्नीच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम 354 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हवलदार ठाकरे हे करीत आहेत.