शिरपूरात तणावपूर्व शांतता ; हाणामारी प्रकरणी सहा जणांना अटक

0

दगडफेकीत चौघे जखमी ; पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त

शिरपूर- शहरातील किस्मतनगर भागात किरकोळ वादातून रविवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गावात या प्रकारानंतर तणावपूर्व शांतता असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी समदअली सैय्यदअली, आकाश संजय चौधरी, राहुल रतिलाल सुतार, राहुल अशोक चौधरी, मुस्तफा उर्फ भुर्‍या शहा गफ्फार शहा, रज्जाक अली सय्यद अली या सहा संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, दगडफेकीत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Copy