शिरपूरकरांना दिलासा: एका दिवसात १० जण कोरोना मुक्त

0

शिरपूर: शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असतांना शहरवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. धुळे व शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या शहरातील १० रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केल्याने रुग्णालयातुन त्यांना डिस्चार्ज केले आहे.
शहरात रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत असताना धुळे व शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले शहरातील १० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यात ४ पुरुष, एक बालिका व पाच महिलांचा समावेश आहे.

यावेळी शिरपूर व धुळे येथे प्रांत विक्रमसिंग बांदल,तहसीलदार आबा महाजन,वैद्यकीय अधीक्षक डी.एन.वाघ, नोडल अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विशाल पाटील धुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज पाटील, कोरोना इन्चार्ज सिविल हॉस्पिटल धुळे, डॉ. स्वप्नील पाटील,डॉ.कपिल पाटील, डॉ.अमोल जैन, मोहसीनखान डॉ.मोहसीन खान, डॉ.योगेश अहिरे, डॉ. महेंद्र साळुंखे, नगरसेवक इरफान मिर्झा व शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील किशोर पाटील, के.झेड.पगार, व्ही.डी.निकम, व्ही.एस.धाकड, भगवान बोरसे,सावता माळी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Copy