शिरपुरात 6 वर्षीय बालकाची निर्घृण हत्या

0

शिरपूर: तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात एका अज्ञाताने सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. मोहित दिनेश ईशी (6) भरदुपारी हा खून झाला असावा असे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका व जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या. अंतुर्ली
येथील दिनेश शिवाजी व ज्योती दिनेश ईशी यांचा तो मुलगा होता.

मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता. दुपारी खेळत असताना अचानक गायब असल्याचे आई ज्योती हिच्या लक्षात येताच शोधाशोध सुरू केले परंतु तो मिळून आला नाही. शोध घेत असतांना सायंकाळी उशिरा एका शेतात तो मृतावस्थेत आढळून आला.

घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सोनवणे, पोहेकॉ गुलाब ठाकरे, पोलीस नाईक अनिल शिरसाट, ललित पाटील, दिनेश माळी, रवींद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, उमेश पाटील, स्वप्नील बांगर आदींनी पाहणी केली. तर घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, स्वान पथक, सायबर क्राईम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींचे अधिकारी व कर्मचारी होते. घटनेचा पुढील अधिक तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.

Copy