शिरपुरात शेती पूरक व्यवसायातील उद्योजक निर्माण कार्यशाळा

0

शिरपूर । शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायासोबतच विविध मार्गाने प्रगती साधण्यासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर शनिवार दि. 6 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून शेती व शेती-पूरक व्यवसायातील उद्योजक निर्माण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सुवर्ण कोकण-सामर्थ्य महाराष्ट्राचे या चळवळीचे तज्ज्ञ मार्गदर्शक व घाटकोपर मुंबई येथील सुवर्ण कोकण फाउंडेशनचे प्रमुख सतिष परब हे शेतकरी बांधवांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. शेती व पाणी असतांना योग्य नियोजन व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे शेती व्यवसाय फारसा समाधानकारक राहिला नसल्याने अनेक शेतकरी बांधव शेती व्यवसायापासून लांब जावू लागले आहेत. यासाठी त्यांनी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला आहे.