शिरपुरातून दोन मोटार सायकलींची चोरी

0

शिरपूर। शहरातील मुकेश पटेल टाऊन हॉलसमोरुन मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना दि. 16 रोजी दुपारी घडली.शिरपूर पोलिसांत मुस्ताक शमसोद्दीन खाटीक(58) रा.खाटीक गल्ली यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची हिरो होंडामोटारसायकल (एमएच 18 टी 8889) चोरीस गेली आहे.

दुचाकीची किंमत 15 हजार रुपये आहे. याबाबत शिरपूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हवालदार राजन दुसाने तपास करीत आहेत.तर दुसर्‍या घटनेत शहरातील प्रियदर्शिनी कॉलनीतील प्लॉट नं.18 मध्ये राहणारे डॉ.सुशिलकुमार वाघ यांची हिरो कंपनीची मोटारसायकल चोरीस गेली आहे.