शिरपुरातील एकाला कोरोनाची लागण

0

शिरपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळलुन येत होते. मात्र काल १९ रोजी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार शिरपूर शहरात भुपेश नगर भागातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण शिरपूर शहरातील २० ते २२ मे पर्यत शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.

लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा,साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम १८८ नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश शिरपूर प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल यांनी दिले आहेत.

Copy