Private Advt

शिबिरात 147 ज्येष्ठ नागरिकांची हाडांची ठिसूळता तपासणी

नंदुरबार। लायन्स क्लब व जेष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित तपासणी शिबिरामध्ये 147 ज्येष्ठ नागरिकांची हाडांची ठिसूळता तपासणी करण्यात आली आवश्यकतेनुसार त्यांना विटामिन डी व मल्टिपल विटामिनच्या औषधी मोफत वाटण्यात आल्या. तसेच काही जनरल आरोग्यविषयक तक्रारींचे निवारण डॉ. सी डी महाजन, डॉ. राकेश पटेल, डॉ.अर्जुन लालचंदानी या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केले. दर तीन महिन्यांनी आशा कॅम्पचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन लायन्स क्लबचे अध्यक्ष शेखर कोतवाल, राहुल पाटील यांनी दिले.

 

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग माळी, अध्यक्ष वसंत चौधरी, राधेश्याम सोनार, राजाराम निकम, राजेंद्र भावसार, देविदास वसईकर, अशोक टेंबेकर, रामभाऊ चौधरी तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.