शिबिराच्या नावाखाली ग्रामीण भागातील जनतेची लूट

0

जळगाव । सध्या सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, व्यक्ति यांच्यामार्फतर्फे रुग्णांसाठी मोफत शिबीर राबविले जातात. सामाजिक जबाबदारीची भान ठेवुन देखील अनेक व्यक्ति, संस्था शिबीरे राबवित असतात. शिबीराचा अनेक गरजु व गरिबांना फायदा होत असतो. अनेक राजकीय व्यक्तिंकडून मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. शिबीराच्या माध्यमातुन मोफत उपचार होत असल्याने अनेक रुग्ण याचा लाभ घेतात. गरीब जनतेकडे उपचाराकरीता पैसे नसल्याने अनेक वेळा त्यांना जीव गमावावा लागतो. त्यामुळे शासन गरीब जनतेच्या आरोग्याकरीता विविध उपाय योजना राबवित आहे. आरोग्य शिबराच्या नावाने ग्रामीण भागातील जनतेची लुट होत असल्याचे सध्या दिसुन येत आहे. यामुळे लूट होत आहे.

शासकीय योजनांमध्ये घोळ
ग्रामीण भागातील जनतेची आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याइतकी एैपत नसते. अनेक वेळा आर्थिक पाठबळ नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागतो. हे लक्षात घेऊन शासनातर्फे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सारखे उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन दारिद्र रेषेखालील जनता विविध प्रकारचे उपचार मोफत करतात. तसेच शासकीय रुग्णालयामध्ये देखील मोफत उपचार होत असते. परंतु मोफत शिबीराचे आयोजन करुन शासनातर्फे गरीबांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये आर्थिक घोळ होत असल्याचे सुरु ग्रामीण जनतेमधुन निघत आहे.

फुपणी येथे शिबीर
जळगाव तालुक्यातील नंदगाव परिसरातील फुपणी येथे मंगळवारी 21 मार्च रोजी डोळ्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे आयोजक असलेले तंज्ञ डॉक्टरांकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रमाणपत्र नसल्याचे बोलले जात आहे. यामुळेच या भागातील गरीब रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या या बोगसगीरीकडे आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री यांनी त्वरित लक्ष देवून चौकशी करावी व अशिक्षित गरीब रूग्णांची लूट थांबवावी आणि यामुळे सरकारी योजनांचा होत असलेल्या दुरूपयोगाला आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.