शिफारशीसाठी कालमर्यादा वाढविण्याची राज्य संघटनांची मागणी

0

नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी ठरविण्यात आलेली कालमर्यादा २७ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी बीसीसीआयशी संलग्न अनेक राज्य क्रिकेट संघटनांनी प्रशासकीय समितीकडे (सीओए) केली आहे. सीओएने २३ फेब्रुवारीपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींचा अंमल करीत १ मार्चपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करावा, असे बजावले होते.

२० राज्य संघटनांच्या अयोग्य घोषित पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना लिहिलेल्या पत्रात अमिताभ चौधरी यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून २७ मार्चच्या सुनावणीपर्यंत वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली होती. यापैकी एका राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सोओएला पत्र लिहिले आहे. २७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली असून तीन वर्षांच्या तीन कार्यकाळातील ‘कुलिंग पिरियेड’ संदर्भात अद्याप स्पष्टता आलेली नाही. आम्ही लोढा समितीच्या श्फिारशी केल्याचा अहवाल सादर करण्याऐवजी प्रतीक्षा करण्याचे धोरण अवलंबले आहे. अमिताभ चौधरी यांनी आपल्या याचिकेत सोओएच्या अखत्यारितील बाबींवर स्पष्टीकरणाची विनंती केली आहे.