शिधावाटपात पारदर्शकता आणण्यासाठी कसली कंबर

0

मुंबई । शिधावाटप दुकानांमधील काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. गोदामांपासुन निघालेले धान्य नेमके कोठे नेण्यात येत आहे, याची माहिती केवळ मंत्रालयच नाहीतर सामान्य ग्राहकालाही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच शिधावाटप दुकानांमधील सर्व व्यवहार संगणकाव्दारे आणि कॅशलेस करण्यात येणार आहेत. शिधावाटपात पारदर्शकाता आणण्यासाठी विभागाच्या वतीने घेण्यात आल्याचे संबंधित अधिकार्‍यांने सांगितले. भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) गोदामांमधून शिधावाटप दुकानांसाठी खरेदी केलेले धान्य अनेकवेळा मधल्यामध्येच गायब केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. धान्याने भरलेले ट्रक दुकानांकडे न आणता अन्यत्र वळविले जात असल्याच्या तक्रारीवरुन काही महिन्यांपुर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अशा वाहनांवर जीपीआरएस यंत्रणा बसविली होती. पण सदर यंत्रणा मोटार सायकलला बसवून शासकिय यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे ही यंत्रमा कुचकामी ठरल्याचे पाहुन आता पुरवठ्याची पध्दत (सप्लाय चैन मॅनजमेंट) बदल करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. नव्या यंत्रणेनुसार एफसीआयच्या गोदामातून धान्य घेवून वाहन निघाल्याचा एसएमएस जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना केला जाणार आहे. संबधीत अधिकारी शासकीय गोदाम अधिकारी, तहसलिदार, दुकानदारांपर्यंत असे एसएमएस पाठवले जाणार आहेत. इतकेच नाहीतर या प्रवासादरम्यानची माहितीही एका क्लिकवर समजणार आहे.