Private Advt

‘शिक्षक रंगले जुगारात’ : मुक्ताईनगरात 12 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुक्ताईनगर : शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या पत्ता जुगाराच्या क्लबवर मुक्ताईनगर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता टाकलेल्या धाडीत 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोख रक्कमेसह चार दुचाकी, सात मोबाईल , जुगाराचे साहित्य मिळून एक लाख 36 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, अटकेतील आरोपींमध्ये शिक्षकांचाही समावेश असल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रंगात आलेला डाव उधळला
मुक्ताईनगरात आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांच्या घराजवळ सार्वजनिक जागी अवैधरीत्या पत्त्याचा डाव सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळताच मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यावेळी आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, निलेश कालिदास पाटील, विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अतुल जावरे यांना अटक करण्यात आली. चार दुचाकी, सात मोबाईल व रोख रक्कम एक लाख 36 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. कॉन्स्टेबल शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात 12 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार आसीम तडवी करीत आहे.