शिक्षक भरतीच्या नावाखाली सरकारने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली-राष्ट्रवादी

0

मुंबई- राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री यांनी केली. फेब्रुवारी महिन्यात ही घोषणा केली होती. या घोषणेला ७ महिने उलटली मात्र अद्यापही घोषणेबाबत अंमलबाजवणी झालेली नाही. शिक्षक भरती होणार असल्याने तरुण दिवसरात्र परीक्षेची तयारी करीत आहे. मात्र अद्याप शिक्षक भरती झालेली नसल्याने सरकारकडून तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून आरोप केले गेले. जबाब दो या हॅशटॅगखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला जाब विचारले आहे.

Copy