शिक्षकाकडून मागितली लाच : सोनगीरातील मुख्याध्यापकासह शिक्षक एसीबीच्या जाळ्यात

Married Woman Harassed For Not Bringing 2 lakhs for job : Crime Against Four Including Husband धुळे : शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर त्यावर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील एन.जी.बागुल हायस्कूलचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी (55) व उपशिक्षक पठाण हफीज खान हनीफ खान (48) यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक शिक्षकांकडेच मागितली लाच
तक्रारदार हे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक माळी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. या नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी मुख्याध्यापक यांच्या सांगण्यावरून सहाय्यक शिक्षक हाफिस खान पठाण यांनी 20 सप्टेंबर 2022 रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजारांची लाच मागितली होती तर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. मंगळवार, 18 रोजी पुन्हा मुख्याध्यापकांनी लाच मागणीला दुजोरा दिल्यानंतर बुधवारी दुपारी सापळा रचण्यात आला. सोनगीर पोलिस ठाण्याजवळील महामार्गावर संशयीतांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, संदीप कदम, गायत्री पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.