शिक्षकांना मिळणार कोट्यवधींची थकबाकी

0

मुंबई: ठाणे, मुंबईसह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे विविध प्रलंबित प्रकरणांमध्ये कोट्यवधींची थकबाकी थकविल्याच्या निषेधार्थ शिक्षक संघटनेने 16 जानेवारीपासून शिक्षण सचिवांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी याबाबत शिक्षण विभागाने शासन निर्णय करून जारी करून शिक्षकांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅन मधील सैनिकी शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, माध्यमिक शाळांमधील तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे नियमित व थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतल्याने आमदार रामनाथ मोते यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे.

शासनाने ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे विविध प्रलंबित प्रकरणांमध्ये सुमारे 34 कोटी रुपये थकविले होते हि रक्कम 15 जानेवारी पर्यंत अदा न केल्यास राज्याच्या शालेय शिक्षण सचिवांच्या कार्यायांसमोर 16 जानेवारीपासून आंदोलन करू असा इशारा शिक्षकांनी केला होता या शासन निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील प्लॅन मधील नवीन शाळा व तुकड्यांचे 3 कोटी 82 लाख, वाढीव तुकड्यांचे 2 कोटी 99 लाख, आदिवासी विभागातील शाळांचे 1 कोटी 73 लाख, कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांचे 1 कोटी 76 लाख, आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्यांचे 14 लाख रुपये प्रलंबित रक्कम मिळणार आहे.