शिक्षकदिनी 185 शिक्षकांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान

भुसावळातील स्व.नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

भुसावळ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील जुना सतारे भागातील स्व.नारायण पाटील बहुउद्देशिय संस्थेतर्फे रविवारी भुसावळातील 185 शिक्षकांचा सहृदय सन्मान कर्तव्यदक्ष नगरसेवक मुकेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कोरोनामुळे जाहिर कार्यक्रम न घेता गेल्यावर्षाप्रमाणे प्रत्येक भागात जावून शिक्षकांना गौरविण्यात आले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी गुरु – शिष्यांच्या नात्यांतील पवित्र परंपरा नगरसेवक पाटील हे जपत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रत्येक भागात जावून केला सन्मान
क्षेत्र कोणतेही असो किंवा विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती करो, त्यामागे जे ज्ञान असते एका शिक्षकाचेच. जगात सतत बदल होतात, नवनवे शोध लावण्यासाठी विद्यार्थी तयार करतात ते शिक्षकच. आमच्या जीवनात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिक्षकांचा गौरव करण्याचे उपक्रम राबवला जातो, अशी माहिती यावेळी नगरसेवक मुकेश पाटील यांनी दिली. गेल्या वर्षीही कोरोनाचा प्रकोप असताना नगरसेवक मुकेश पाटील यांनी शिक्षकांच्या घरोघरी जावून त्यांचा गौरव केला होता. यंदाही प्रत्येक भागात जावून शिक्षकांना स्मृतीचिन्ह, मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy