शिंदे सरकारमधील या ‘नऊ’ आमदारांची मंत्रीपदी लागणार वर्णी !

मुंबई : शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार कधी होणार? याबाबत विरोधकांकडून सातत्याने टिकेचा सूर आवळला जात असताना मंगळवार, 9 रोजी शिंदे सरकारमधील नऊ आमदारांना मंत्री पदाची शपथ देण्यात येईल, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीहून परतल्यानंतर सोमवारी फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये बैठक होताच मंगळवारी मंत्री मंडळ करण्याबाबत निश्चिती झाली.

यांना मंत्री पदाची संधी
शिंदे गट : गुलाबराव पाटील (जळगाव), दादा भुसे (नाशिक), उदय सावंत, संजय शिरसाठ

भाजपा : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण पाटील, बच्चू कडू