शिंदी येथील शौचालय बांधकामाची चौकशी करावी

0

भुसावळ । महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील शिंदी येथे सार्वजनिक शौचालयाचे काम मंजूर करण्यात आले आहे मात्र अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने याची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच सिध्दार्थ तायडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र वायकोळे यांनी केली आहे. शिंदी येथे महिला व पुरुषांसाठी सहा सिटस्चे शौचालय बांधकाम व नळकनेक्शन देण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भात ठेकेदाराने शौचालयाच्या टाकीचे काम केले आहे. परंतु इतर उर्वरित कामे अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सोमवार 23 जानेवारीला ग्रामपंचायत प्रशासनातर्फे ठरावदेखील करण्यात आला आहे.