शिंदखेड्यात कोरोना संशयित; तपासणीसाठी धुळे येथे रवाना

0

शिंदखेडा (प्रतिनिधी)- शहरात कोरोना संशयीत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाल्याने तात्काळ प्रशासनाची पूर्ण टीम संशयीताच्या घरी दाखल झाली. परिवाराचा सुरूवातीस प्रचंड विरोध झाला.प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारल्यावर संशयीत व त्याचे कुटुंबिय तयार झाले. तपासणीसाठी रवाना करण्यासाठी प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागली. या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपासून शिंदखेडा शहरात संशयित असल्याची चर्चा होती. शिंदखेडा तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, प्रल्हाद देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भूषण मोरे , वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेखा बोरडे यांच्याशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. तात्काळ सर्व अधिकारी, कर्मचारी हे संशयिताच्या घरी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी संशयिताला होम कोरेनटाईन करण्यात आले असून मी गुजरात हुन आलो आहे अशी माहिती दिली होती. मात्र दिलेली माहिती ही चुकीची असल्याचा संशय प्रशासनाला होता. संशयिताचा संबंध मरकस तबलीगीशी असण्याचा दाट संशय असून या बाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यानुसार आज प्रशासनाने संशयीताचे घर गाठले.मात्र परिवाराने यावेळी तीव्र विरोध केला. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पी एस आय सुशांत वळवी यांनी पोलीसी बडगा उगारल्यानंतर संशयिताला ताब्यात पुढील तपासणी साठी धुळे हिरे वैद्यकीय महाविद्याल येथे पाठवण्यात आले. तर घरातील संशयित 6 सदस्यांना होम कोरेनटाईन करण्यात आले आहे.

Copy