शिंदखेड्यात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद, 16 जणांवर गुन्हा

0

धुळे- शिंदखेडा येथील सिध्दार्थ नगर परीसरात किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद झाला. याप्रकरणी दोन्ही गटातील 16 जणांविरुद्ध गुन्हा दखल झाला. प्रकाश गिरधर पाटोळे यांच्या तक्रारीनुसार, कल्पना हिमंत मंगळे, माधुरी नंदकिशोर बोरसे, कमलबाई भिवसन देवरे, अजय हिमंत मंगळे, नंदकिशोर तुळशिराम बोरसे, हिंमत बुधा मंगळे यांनी शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तसेच कुर्‍हाडीच्या दांड्याने वार केला. त्यामुळे प्रकाश याच्या डोक्यावर व कपाळावर इजा झाली. दुसर्‍या गटातर्फे कल्पना हिंमत मंगळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रकाश गिरधर पाटोळे, गिरधर सुपडू पाटोळे, कंचन प्रकाश पाटोळे, संगीता दगा मंगळे, शिवा गिरधर पाटोळे, दगा हिंमत मंगळे, चुडामण सुपडू पाटोळे, निर्मला चुडामण पाटोळे, छायाबाई राजेंद्र अहिरे, राजेंद्र अहिरे यांनी वाद निर्माण केला. तसेच कल्पनाबाई त्यांची मुलगी माधुरी, जावई नंदकिशोर बोरसे यांना मारहाण केली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटातील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.