शिंदखेड्यात अंधश्रद्धा निर्मुलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

0

शिंदखेडा । येथील सत्यशोधक मंडळ आणि क्रांतीज्योती महोत्सव 2017 अंतर्गत पहिल्या दिवाशी 9 एप्रिल स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या बुवबाजीचा पर्दाफाश कार्यक्रम घेण्यात आला. बिसाजसनी मंगल कायालयात नाशिक येथील स्पेक्ट्रम अ‍ॅकॅडमीतर्फे विनामुल्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेल येथील कृषी अधिकारी मनोहर माळी होते. पहिल्या सत्रात प्रा. गजानन उघडे या पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. जी. एल. ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. जी. एच. ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

जनतानगर येथे बुवाबाजीचा पर्दाफाश कार्यक्रम
या कार्यक्रमास अनिल वानखेडे, मनोहर पाटील, सुभाष माळी, भिला पाटील, सुनील चौधरी, प्रवीण माळी आणि विद्यार्थी उपस्थित होते. रात्री जनतानगर येथे बुवाबाजीचा पर्दाफाश या अंधश्रद्धा निर्मूलनवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. परेश शाह, भिका पाटील यांनी बुवाबाजीचे विविध प्रयोग दाखवून त्यातील विज्ञानिक कारणे आणि हातचलाखी उलगडून दाखविली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणी पुरवठा सभापती तुकाराम माळी होते. याप्रसंगी युवराज माळी, त्र्यंबक माळी, सुभाष माळी, रामदास माळी, भिमसिंग गिरासे, भटू माळी, साईनाथ माळी, महेश माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.