शिंदखेडा शहरात साठ तासांच्या जनता कर्फ्यूला शंभरटक्के प्रतिसाद.

शिंदखेडा –  क़ोरोनाच्या दुस-या  लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने  रविवार व सोमवारी जनता कर्फ्यु लागू केल्याने  शहरातील बाजारपेठ गल्ली ते काॅलनी मुख्य परिसर चौका-चौकात रस्त्यावर शुकशुकाट असून कोरोना वर मात करण्यासाठी शिंदखेडा शहरातील  व्यापारी बांधवांनी आप आपले छोटे-मोठे सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवून कर्फ्यू ला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दुस-या टप्प्यातील व्हायरस‌  महाराष्ट्रसह विवीध राज्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे हा व्हायरस जलद गतीने पसरून यांची लागण होत असल्याने  लागण थांबविण्यासाठी स्थानिक पातळीवर रविवार-सोमवार  हे दिवस जनता कर्फ्यू म्हणून पाळले जात आहे, याच पार्श्र्वभूमीवर शिंदखेडेकऱ्यांनी सर्व‌  व्यवहार दुकाने बंद ठेवून  आपले विवीध कार्यक्रम वगळून आप-आपल्या घरातच थांबून कोरोना व्हायरस ला पळविण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र निर्माण झाले होते,शहरातील मुख्य परिसर,बस स्टँड, गांधी चौक,मेन रोड, बाजारपेठ, काॅलनी, गल्लीतील चौका-चौकात शुकशुकाट असून अनेकांनी घरातच रहाणे पसंत केले आहे,तसेच जनता कर्फ्यू च्या पार्श्र्वभूमीवर नागरीकाची रस्त्यावर व बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन व नगर पंचायत  भूमिका बजावत असल्याचे चित्र होते.   तसेच मुख्य परिसरातील बाजारपेठेत बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासना तर्फे वारंवार करण्यात येत आहे,
जनता कर्फ्यु निमित्ताने रविवार सकाळपासूनच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपालिका कर्मचारी कार्यरत होते. महसूल व पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांनी घरी थांबावे अशा सूचना दिल्या जात होत्या. तहसीलदार सुनिल सैंदाणे,नगराध्यक्षा रजनी वानखेडे ,मुख्याधिकारी   प्रशांत बिडकर,प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे
पोलीस निरीक्षक सुनिल भाबड,  यांच्यासह महसूल, पोलिस विभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
भाजी मंडई , बससेवा, किराणा दुकाने  या महत्त्वाच्या सेवाही बंद होत्या.