शिंगोळा गावाजवळ दुचाकीला एसटीची धडक

0

जळगाव । महुखेडा येथील तिघे दुचाकीने ट्रीपलसीट फत्तेपूर येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शिंगोळा गावाजळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला समोरून एसटी बसने जोरदार धडक दिली. यात तिघे फेकले जावून ते गंभीर जखमी झाले. त्यांना दुपारी 12.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली.

मुलगी पाहण्यासाठी जात होते फत्तेपूरला
ईश्‍वर नारायण पवार याच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम फत्तेपुर येथे होता. त्यामुळे ईश्‍वर व त्याचे चलुत भावडं निलेश देवतार पवार (16) व कैलास मिश्रीलाल पवार (22) सर्व रा. महुखेडा ता. जामनेर हे तिघे सकाळी महुरेखेडा येथून फत्तेपुर येथे जाण्यासाठी ट्रीपलसीट दुचाकीने निघाले. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शिंगोळा गावाजवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला एसटी महामंडळाच्या बसने समोरून धडक दिली. यात दुचाकी घसरून तिघे रस्त्याच्या कडेला फेकले. यात तिघांना हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांनी तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघातात तिघांच्या पायाला गंभीर इजा झाल्या आहेत.

45 वर्षी इसमाची आत्महत्या
जळगाव-तालुक्यातील भोकर येथील 45 वर्षीय प्रौढाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 11.50 वाजेच्या पुर्वी नवल जयराम सोनवणे यांनी राहते घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.पोलीस पाटील हेमलता पवार यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.