Private Advt

शाहूनगरातील महिला बेपत्ता

शहरातील शाहू नगर येथील चंद्रकला चौधरी वय 55 ही महिला बेपत्ता झाली आहे. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. महिना उलटूनही महिला मिळून न आल्याने रविवारी शहर पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याबाबत माहिती प्रसिध्दीसाठी दिली आहे. चंद्रकला चौधरी या 14 डिसेंबर रोजी शाहू नगर येथून कोठेतरी निघून गेल्या. सर्वत्र शोध घेवूनही त्या मिळून न आल्याने चंद्रकला चौधरी यांचे भाऊ ककाशिनाथ तुकाराम चौधरी यांनी 6 जानेवारी रोजी शहर पोलिसात तक्रार दिली.