शाहरुख खान उतरणार हॉकीच्या मैदानात

0

मुंबई- किंग खान अर्थात शाहरूख खान यांचा 2007 साली ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे. या चित्रपटात शाहरुख खान याने प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. दरम्यान आता शाहरूख खान खऱ्या मैदानात चक दे इंडिया करताना दिसणार आहे आणि तेदेखील भारतीय हॉकी संघासोबत.

भारतीय हॉकी संघातील खेळाडूंनी शाहरूख खानला आपल्यासोबत हॉकी खेळण्यासाठी निमंत्रण दिले आहे. टीमने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात पूर्ण हॉकी टीम शाहरूख खानला मैदानात हॉकी खेळण्यासाठी बोलवत आहेत. खेळाडूंनी किंग खानला सांगितले की, ‘तुम्ही दाखवून द्या की तुमचे हृदय देखील हॉकीसाठी धडकते. आता शाहरूख खान त्यांच्यासोबत हॉकी खेळण्यासाठी मैदानात उतरेल का, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या व्हिडिओ उत्तरदेखील किंग खानने दिले आहे. शाहरूखने ट्विटरवर लिहिले की, नेकी आणि पूछ पूछ. मी उडी मारून पोहचेन त्या ठिकाणी. हॉकी देशाची शान आहे आणि माझ्याकडून टीमला खूप शुभेच्छा. माझ्याबद्दल विचार केला म्हणून मी आभारी आहे आणि हो… माझे हृदय हॉकीसाठी खूप जोरात धडकते आहे.’

शाहरूख खान हॉकी टीमसोबत खेळायला मैदानात कधी उतरतो व किती गोल मारतो हे पाहण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागेल. नक्कीच हा सामना बॉलिवूड व हॉकी प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरेल.

Copy