शाहरुखने माफी मागावी…

0

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याची फॅन फॉलविंग प्रचंड आहे. सध्या चाहत्यांमध्ये शाहरुख विषयी चिंता सुरु आहे. कारण ओडिसातील कलिंग सेनेने तोंडाला काळे फासण्याची धमकी शाहरुख खानला दिली आहे. या धमकीनंतर शाहरुखच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.

शाहरुखचा १७ वर्षांपूर्वी ‘अशोका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कलिंगची संस्कृती चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा, आरोप कलिंग सेनेने केला आहे. ओडिशातील लोकांच्या यामुळे भावना दुखावल्या गेल्याने शाहरुखने माफी मागावी, अशी मागणी कलिंग सेनेने केली आहे. २००१ पासून या वादाची सुरुवात झाली होती.

Copy