शासनाने नाभिक व्यवसायिकांना आर्थिक मदतीचा हात द्यावा;

0

शिंदखेडा शहर नाभिक संस्थेचे शहराध्यक्ष विजय सैंदाणे यांची मागणी
शिंदखेडा । कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशभर झालेल्या संचारबंदीने कष्टकरी, मोलमजुरी करणारे मजूर यांच्यासह नाभिक बांधवांचा व्यवसायही लॉकडाऊन झाला आहे. मागील 29 दिवसापासून लहान-मोठे व्यवसाय प्रभावी झाल्यामुळे उत्पन्न पूर्णपणे बंद आहे. हा आर्थिक फटका सर्वांना बसत आहे. दरम्यान, इतके दिवस कसेबसे काढले पण येथून पुढे सर्वांचे जगणे अत्यंत कठीण होत चालले आहे. शासनाने तातडीने नाभिक व्यवसायिकांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्थेचे शहराध्यक्ष विजय सैदाणे ह्यांनी केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने नाभिक व्यवसायिकांचा ग्राहकांशी जवळचा संबंध येतो. वेगवेगळे ग्राहक येतात. त्यांची दाढी व कटिंग करताना काही अंतर राहते. परिणामी एखादा संक्रमित ग्राहक असल्यास पर्यायाने नाभिक किंवा इतरही संसर्ग होण्याचे नाकारता येत नाही. हे सर्व सत्य असले तरी या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह केवळ या व्यवसायावरच अवलंबून आहे. प्रत्येकांच्या घरात पाच ते सहा व्यक्ती असतात. अन्नधान्य, शिक्षण, आजार हे सर्वच प्रश्न सलून व्यवसायामुळे कसे तरी सुटतात. पण सद्यस्थितीला आवक पूर्ण बंद आहे. मात्र, खर्च थांबलेला नाही. अशा परिस्थितीत प्रपंच चालवावा कसा? असा यक्ष प्रश्न नाभिक व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे.

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ
शिंदखेडा शहरात जवळपास साठ नाभिकांची दुकाने आहेत. बर्‍याच दुकानात निमपातीने काम करणारे कारागीर आहेत. त्यांना आलेल्या पैशातून अर्धे पैसे रोजच्या रोज द्यावे लागतात. उर्वरित पैशामध्ये सलुन मालकाला भागवावे लागते. त्यात दुकान भाडे, लाईट बिल, पेपर बिल इतर खर्च असतो. लॉकडाऊनमुळे समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दानशूर दानधर्म करीत आहेत. पण तेही यांचे नशीबी नाही. अशा परिस्थितीत साधा व गंभीर आजार कोणाला झाला तर पैशाअभावी तो हतबल होतो. प्रसंगी रुग्णाच्या प्राणावरही बेतु शकते. मागील 29 दिवसांपासून लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सलून व्यवसायिक घरातच बसून आहेत.

Copy