शासनाच्या विविध योजना जनकल्याणासाठी प्रयत्नशिल

0

रावेर । जिल्हा परिषदेच्या ऐनपूर-खिरवळ गटातून रंजना प्रल्हाद पाटील या भाजपाच्या उमेदवार असून येथून निवडणूक लढवित आहे. त्यांचे पती प्रल्हाद महाजन यांचे सर्व समाजाशी जिव्हाळ्याचे संबंध असून सर्वतोर परिचित आहे. येथील गटाची जागा महिला ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांनी त्यांच्या पत्नी रंजना पाटील यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरविले आहे. गटातील सर्वच गावे प्रचारार्थ रॅलीच्या माध्यमातून ढवळून काढलेले आहे. त्यांच्या उमेदवारीने इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांची हवा गुल झाल्याचे चित्र दिसत आहे.

गटाच्या विकासकामांना प्राधान्य देणार
जनतेने मला जिल्हा परिषदेत निवडून पाठविल्यास प्रथम महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करण्यास तयार राहील. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गटातील शुध्द पाण्याचा पुरवठा घरोघरी नेण्यासाठी प्रयत्नशिल राहील. यासह गावरस्ते, शिवरस्ते, गटारी, दलित वस्तीची कामे, बुध्दविहार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे रंजना पाटील यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरीक, युवा, महिलांचा सहभाग
ऐनपूर-खिरवड जिल्हा परिषदेच्या संपूर्ण गटात रंजना पाटील यांना ज्येष्ठ नागरीक, युवा, महिलांचा प्रचार रॅलीत सहभाग नोंदवत आहेत. ठिकठिकाणी महिला पाटील यांचे औक्षण करत आहे तर त्यांच्या हायटेक प्रचारामुळे संपूर्ण गट ढवळून निघाला आहे.