शासनाकडून शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळणार

0

 रावेर : राज्य व केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे शेतमालाला शासनाकडून योग्य भाव दिला जाईल. तसेच 500 हेक्टरच्यावर तुरीची लागवड असल्याने यंदा आवक जास्त आहे. त्यामुळे शासनामार्फत खरेदीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी, मका खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आमदार जावळे आले होेते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. त्यांनी शेतकर्‍यांच्या शेतीमालाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे मागणी केली. यावेळी उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
कृउबा सभापती डॉ. राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, प्रमोद धनके, जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, पद्माकर महाजन, जिल्हा परिषद सदस्या कोकिळा पाटील, नायब तहसिलदार सी.एच. पाटील, वासु नरवाडे, सुनिल पाटील, सुरेश चिंधू पाटील, दिलीप कांबळे, अमित तडवी, अ‍ॅड. आर.के. पाटील, गोंडू महाजन उपस्थित होते.