शासकीय विज्ञान संस्थेत विविध विषयांवर आज व्याख्यान

0

मुंबई : शासकीय विज्ञान संस्थेतर्फे पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह विविध मान्यवरांची व्याख्याने उद्या, शुक्रवार दि. 6 जानेवारीला सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहेत.संस्थेतर्फे प्रा. बी. सी हलदर, प्रा.के.एम.जोशी आणि प्रा.एस.व्ही.सोमण यांच्या स्मृत्यर्थ आयोजित या व्याख्यानमालेत पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंह , नीरी संस्थेचे संचालक डॉ. राकेश कुमार, प्राध्यापक डॉ. सौरभ पाल, जलसंवर्धन क्षेत्रातील पोपटराव पवार यांची व्याख्याने होतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.