शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना बँक खात्याचा तपशिल अनिवार्य

0

चाळीसगाव। शासनातर्फे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा, अपंग निवृत्ती वेतन योजना व महाराष्ट्र शासनाकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांची अद्यापपावेतो आपले राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथील संजय गांधी शाखेत जमा करावयाचे राहिले असतील अशा चाळीसगाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 25 मार्च 2017 पर्यंत आपले आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स त्वरीत तहसिल कार्यालयातील संजय गांधी शाखेकडे जमा करण्याचे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.

जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
ग्राहक अन्यायाविरुध्द उपाय योजना करतांना जागृत ग्राहक, संघटीत ग्राहक शक्ती, ग्राहक कायद्याचे ज्ञान व त्याअनुषंगाने समाज समर्पित जागृत ग्राहक निर्मीतीसाठी जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधत 15 मार्च, 2017 रोजी जागतिक ग्राहक दिन 2017 साजरा करण्यात येत आहे. तहसिल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी शरद पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा आशालता चव्हाण, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव बाबासाहेब चंद्रात्रे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ उपस्थित राहणार आहेत. या जागतिक ग्राहक दिनानिमीत्ताने ग्राहक प्रबोधनाकरिता वजनमाप, अन्न व भेसळ, गॅस संबंधीचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ग्राहक प्रबोधनामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहकाने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा, तक्रार कोण करु शकतो, तक्रार कोठे दाखल करावी, अपील कसे दाखल करावे.

जमा न झाल्यास अनुदान बंद होणार
शासन ध्येय धोरणानुसार 1 एप्रिल 2017 पासुन ऊइढ अन्वये लाभार्थ्याना अनुदान देण्याच्या सूचना असल्याने लाभार्थ्यांचे खाते पोस्ट अगर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतील अशा सर्व लाभार्थ्यांनी त्वरीत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून जुने व नवे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स तहसिल कार्यालतील संजय गांधी योजना शाखेकडे जमा करावी. तरी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशिलासह आधारकार्डची झेरॉक्स, संजय गांधी शाखेकडे 25 मार्च, 2017 पर्यंत जमा करावी अन्यथा त्यांचे माहे एप्रिल 2017 नंतरचे अनुदान बंद होवू शकते याची सर्व संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे तहसिलदार कैलास देवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.