शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ‘मॉकड्रील’ 

डॉक्टर, कर्मचार्‍यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण

जळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आग लागल्यास करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक 27 एप्रिल रोजी अग्निशमन विभागातर्फे दाखविण्यात आले. या मॉकड्रीलप्रसंगी डॉक्टर्स व इतर कर्मचार्‍यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
आग कशी लागते, आगीच्या घटनांचे प्रकार, आग विझविण्याच्या पद्धती, आग विझविण्याचे उपकरण, फस्ट एड कसे हाताळावे, याबाबत माहिती देण्यात आली. आग लागल्याचे ठिकाण शोधणे, अशा घटनेची संबंधित यंत्रणेला माहिती देणे, तसेच एलपीजी गॅस सिलिंडरला आग लागल्यास काय उपाययोजना करावी, यासंदर्भात देखील वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रात्यक्षिकही करुन घेण्यात आले.
विजेच्या पॅनल बोर्डला आग लागल्यास पाणी मारणे टाळा. फायर बिग्रेडच्या वाहनाला घटनास्थळी येण्यासाठी रस्ता मोकळा पाहिजे. त्याकरिता अद्ययावत पार्किंगचे महत्व विशद करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना अग्निशमन विभागाचे अधिकारी शशिकांत बारी, फायरमन विश्वजित घरडे, नितीन बारी, तेजस जोशी यांनी माहिती दिली.
या मॉकड्रिलप्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ.अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक अधिकारी सुनील मोरे, डॉ. इम्रान पठाण, डॉ. इम्रान तेली, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अलोक यादव, अधिसेविका कविता नेतकर, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, कर्मचारी ज्ञानेश्वर डहाके, समाजसेवी अधीक्षक संदीप बागूल, मंगेश बोरसे, अरुण हळदे आदी कर्मचारी उपस्थित होते.