शासकीय तांत्रिक विद्यालयात स्वच्छता अभियान

0

जळगाव- जळगाव शहरात असलेल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेत आज स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी प्रभारी निरीक्षक जिल्हा व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण कार्यालय प्राचार्य, औदयोगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल एन.व्ही चव्हाण, मुख्याध्यापक तथा प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी डी.ए.महाजन आणि संस्थेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

यशस्वीतेसाठी डी.एल.बोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महात्मा गांधीजींचे विचार आपल्या जीवनात अवलंबण्याविषयी विचार मंथन करण्यात आले. यावेळी सर्वानी स्वच्छतेविषयी संकल्प केला.

Copy