शासकीय इतमामात गौतम चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

0

शहादा : भारत माता की जय, वन्दे मातरम अमर रहै अमर रहै, गौतम चव्हाण अमर है अशा घोषना तालुक्यातील पिंपर्डे येथील भारतीय सैन्य दलातील जवान गौतम रंगराव चव्हाण या जवानावर सोमवारी दुपारी साडे बारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला . या वेळी भारतीय सैन्य दलातील अधिकारी व महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात या जवानांचे अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी पोलीस प्रशासनाचा वतीने हवेत तिन राऊड फायर करून श्रध्दांजली देण्यात आली. दरम्यान चव्हान याच्या पार्थिवावर टाकण्यात आलेला तिरंगा त्याचे वडील रंगराव चव्हान याच्या कडे सुपूर्त करण्यात आला.

तालुक्यातील पिंपर्डे येथील गौतम रंगावर चव्हाण या भारतीय सैन्य दलातील जवानांचे जन्मु काश्मीर येथील उदमपुर येथे कर्तव्य बजावीत असताना दोन दिवसा पुर्वी रूदयविकाराने निधन झाले. गौतम चव्हान तिन वर्षा पूर्वी सन 2017 मध्ये भारतीय सैन्य दलातील 57 WEE या कमांड मध्ये उदमपुर येथे भरती झाले होते.

महिना भरापुर्वा ते दिड महिण्याचा सुट्टीवर गावी आले होते.या वेळी सैन्य दलातच अरूणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेला अमोल चव्हाण हा देखील सुट्टीवर गावी आला होता दोघे भाऊ व आई वडील यानी सुट्टीचा कालावधी आनंदात घालवील्या नंतर गौतम चव्हान पाच मार्च रोजी उधमपुर येथे कर्तव्यावर हजर झाले. तर लहाण भाऊ अमोल दहा मार्च रोजी अरूणाचल प्रदेश येथे हजर झाले. कर्तव्य बजावत असताना दोन दिवसा पुर्वी गौतम चव्हान यांचे हृदयविकाराचा निधन झाले. हि वार्ता गावात पोहचतात संपुर्ण परिसरात शोककळा पसरली.

रस्ताच्या दुतर्फा रांगोळ्या आणि फुलांचा वर्षाव

जवान गौतम चव्हान यांचे पार्थीव गावात आल्या नंतर महिलांसह ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव केला यावेळी जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषना दिल्या . रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्याचा सडाही टाकला होता. महिलांचा डोळ्यातुन औघळणारे अश्रु भावपुर्ण वातावरणाचे साक्ष देत होते. जवानांच्या घरासमोर पार्थीव येताच त्याच्या आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण अधिकच भाऊक झाले होते. त्या नंतर फुलांनी सजविलेल्या ट्रालीतुन या जवान पार्थीव अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले.

गावा लागतच्या शेतातील सजविलेल्या चबुतार्यावर अंतिम दर्शनासाठी पार्थीव ठेवण्यात आले. यावेळी पिपर्डे गावासह परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी करोनांचे संकट बाजुला करीत या लाडक्या जवानांच्या अत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. प्रशासनाचा वतीने प्रात अधिकारी डाॅ चेतनसिंग गिरासे. तहसीलदार डाॅ मिलीद कुलकर्णी. सैन्य दलाचा वतीने हवालदार नितीन चौधरी. प्रशांत पाटील पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सकाळ. पोलिस निरीक्षक नजन पाटील. आमदार राजेश पाडवी.आमदार विजयकुमार गावीत. सैनिक कल्याण विभागांचे रामदास पाटील. सरपंच शंकर वाघ. उपसरपंच अमोल मराठे यांनी पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली दिली . पोलिसांनी हवेत तिन राऊड फायर करीत जवानाला मानवंदना देत शासकीय इतमामात अत्यविधी पार पडला. जवानांच्या चुलत भावाने पार्थीवाला अन्नीडाग दिला.

Copy