शाळेत जाणार्‍या चाळीसगावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

A Minor Girl Was Molested in Chalisgaon City चाळीसगाव : शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या 4 ते 5 महिन्यापासून पाठलाग करीत एकाने विनयभंग केल्याने संशयीताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीच्या भावास केली मारहाण
शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या 4 ते 5 महिन्यापासून शाळेत जाताना संशयीत शुभम संजय पाटील याने पाठलाग केला तसेच ‘तू मला आवडतेस, माझ्यावर प्रेम करशील का?’, असे म्हणत नेहमी मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले याबाबत मुलीचा भाऊ संशयिताला समजविण्यासाठी गेला असता त्याला फायटरने मारहाण केल्याने संशयीत आरोपी शुभम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.