शाळा व महाविद्यालयात महापुरूषांना आदरांजली

0

जळगाव – गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा पाटील व महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेल्या गिरीष मनोज सोनवणे यांच्याहस्ते महात्मा गांधी व लाल
बहादूरशास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर
शास्त्री यांच्या जीवनाचा परिचय करून देत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला व ‘अहिंसे’चा संदेश प्रत्येकाजवळ पोहचवला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन देवयानी जगताप, कायनात सैय्यद यांनी केले तर आभार प्रियांका सोनार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला
पाटील, कल्पना तायडे, नेमीचंद झोपे, कमलेश वंजारी, दिपाली चौधरी, अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बहिणाबाई विद्यापिठात आज विविध कार्यक्रम
जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान गांधी
सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता विद्यापीठातील महात्मा
गांधी टेकडीवर भजनांचा कार्यक्रम. 3 रोजी सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात प्राचार्य सुभाष राणे यांचे ‘गांधी विचार : काल, आज
आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान. 4 रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रात रक्तदान शिबीर, 5 ऑक्टोबरला प्रताप तत्त्वज्ञान केंद्र,
अमळनेर येथे एक दिवसीय गांधी विचार शिबीर, 6 रोजी केंद्रीय विद्यालयात 5 वी ते 7च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा. 7 ऑक्टोबर
रोजी विद्यापीठाचे एकलव्य केंद्र, नंदुरबार येथे एक दिवसीय श्रमदान शिबीर, 8 रोजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात
‘आजचा राष्ट्रवाद आणि गांधी विचार’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार असल्याची माहिती केंद्राचे प्र.प्रमुख डॉ.अनिल चिकाटे यांनी
दिली.

मू.जे.त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव – मूळजी जेठा महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महात्मा गांधी जयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात
येत असतात. महाविद्यालयीन युवक-युवतींना महात्मा गांधी यांच्या जीवनाचा, कार्याचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, त्यातील
महात्म्याला अनुभवता यावे म्हणून बापू स्मरण कार्यक्रम, स्वच्छ मू.जे. निर्मल मूल्जियन्स उपक्रम, गांधीजींच्या जीवनावर आधारित
सिनेमा, राउंड टेबल कॉन्फरन्स अतिथी विद्वानाचे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा आदीचे आयोजन केले जातात. या वर्षी २ ऑक्टोबरला
मंगळवारी म.गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी अध्ययन केंद्र, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि स्वरदा
संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मंगल प्रभात आणि बापू स्मरण’ हा भजन, गीत गायन आणि अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी
८.३० वाजता ह्युमॅनिटी बिल्डींग समोर आयोजित केला आहे. ज्यात गांधी प्रिय भजन, चित्रपटांमधील काही प्रेरणादायी गीते स्वरदा संगीत
विभागातील विद्यार्थी सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांकरिता खुला आहे, विद्यार्थी आणि नागरिकांना उपस्थितीचे आवाहन प्राचार्य उदय कुलकर्णी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Copy