शाळा, महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

0

धरणगाव । सध्या तालुक्यात जि.प. व पं.स. निवडणूकीचा उत्साह शिगेला पोहचला असून गटात व गणात अटी-तटीच्या लढत होतांना दिसत आहे. सर्वच पक्षांनी तुल्यबळ उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे एक मोठी घ्दंगलङ पहावयास मिळत आहे. प्रचार सभा, रॅली काढून सर्वच पक्षातील उमेदवार आपणचं घ्रईसङ आहोत अस शक्ती प्रदर्शन करीत असून प्रचारासाठी मोठ्यांपेक्षा शाळकरी मुले महाविद्यालयीन तरूण यांची मोठी गर्दी ठिकठिकाणी दिसत आहे. काही दिवसांनी दहावी व बारावींची बोर्डाची परीक्षा जवळच येवून ठेपली असून सुध्दा विद्यार्थी मात्र प्रचारात सैराट होवून वाहनांमध्ये, सभेत, रॅलीमध्ये फिरतांना दिसत आहेत.

‘झिंगाट’नृत्य करत प्रचारात घेतला सहभाग
विविध पक्षांच्या तसेच आपआपल्या पसंतीच्या उमेदवारांचा चिन्हांचे कपडे, रूमाल, टोप्या, हातात बॅनर घेवून आपल्या दुचाकी वाहनाला पक्षाचा झेंडा बांधून प्रचार करतांना दिसत आहे. प्रत्येक पक्षाच्या सभेला मोठ्या जानकारांची उपस्थिती कमी व विद्यार्थ्यांची गर्दीसाठी वापर होतांना दिसत आहे. उमेदवार प्रत्यक्ष घरोघरी जावून भेटी देत असतांना शाळकरी मुले मोठ-मोठ्याने घोषणा देत ‘झिंगाट’ नृत्य करून आनंद व्यक्त करतांना दिसत आहेत. अनेक ठिकाणी मतदार संघातील गावांमध्ये, प्रचार फेर्‍यांमध्ये लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यासाठी शाळेकडे पाठ फिरवली असून ते प्रचार फेर्‍यांमध्ये आपला सहभाग व उपस्थिती नोंदवत आहे.