शाळांमध्ये 7 एप्रिल ‘आरोग्य दिवस’ म्हणून साजरा होणार

0

मुंबई  : राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने भारतातील सर्व शाळांमध्येही आरोग्य दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिवस म्हणून सर्व माध्यमांच्या शाळेत साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राज्यातही 7 एप्रिल हा आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या आयोजनातून शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देण्याबरोबरच प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१७०३०३१३३७४३१३२१ असा आहे.