शालेय मुलांना पोलीस स्टेशनची सैर

0

पोलिसांबद्दलची भीती दूर करण्यासाठी ‘संस्कृती’ शाळेचा उपक्रम

हडपसर : पोलीस स्टेशन म्हटले भल्याभल्यांना भीती वाटते, डोक्याला ताप नको म्हणून दूर राहिलेले बरे ही भावना दूर करण्यासाठी आणि पोलीस स्टेशनची कार्यशैली दाखविण्यासाठी शालेय मुलांना पोलीस स्टेशनची सैर घडविण्यात आली. या विद्यार्थ्यांनी कामकाज समजावून घेतले.संस्कृती स्कुलच्या उंडरी व वाघोली येथील शाळेतील सहावी ते दहावीमधील विद्यार्थ्यांनी मगरपट्टा येथील सहायक आयुक्त कार्यालय व हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण कारभाराची सविस्तर माहिती जाणून घेतली.

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले कामकाज

पोलीस स्टेशन व सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, गुन्हेचे पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, शिवाजी शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल काळे, तानाजी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अधिकारी कामकाज, ठाणे अंमलदार, पासपोर्ट विभाग, एल. आय. बी., दैनंदिन कामकाज, संगणक प्रणाली कशा पध्दतीने चालते, यावर मार्गदर्शन केले.पोलिसांविषयी असणारी भीती नष्ट व्हावी तसेच मुलांना पोलिसांचा कारभार समजावा या हेतूने ही सहल आयोजीत करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना अधिकारी व कर्मचार्‍यांनी माहिती दिली. बंदूक मुलांनी आजवर चित्रात व टीव्हीवर पाहिली, प्रत्यक्षात पाहून मुले हरखून गेली. त्यांची उत्सुकता पाहून खूप आनंद वाटल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी सांगितले.

Copy