शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सुधारीत आदेश

0

संबंधित अधिकारी व शासनास शिफारस करावी
तळोदा। शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक असलेला तांदुळ शहरी भागातील जिल्हा परिषद शाळा यातील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा सुधारीत आदेश व संबंधित अधिकारी व शासनास शिफारस करावी, अशा आशयाची मागणी येथील नगरसेवक गौरव वाणी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांच्याकडे कड़े केली आहे.


महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप होणारा तांदुळ, दाळी, कड़धान्य, कोरोणा विषाणुचा वाढता प्रादुर्भाव तसेच साथीचे आजार रोखण्यासाठी घरपोहच वितरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.


योजना ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील ज़िल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व त्यांचा पालकांना वितरण करण्यात यावे असे सुधारित आदेश संबंधित अधिकारी व शासनाला शिफारस करण्यात यावी, अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे.
निवेदनावर नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी,सतिवन पाडवी, बापू कलाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Copy