शांत, संयमी नेतृत्व हरपले: मुख्यमंत्र्यांकडून हरिभाऊ जावळेंना श्रद्धांजली

0

मुंबई:माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शांत, संयमी नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत जावळे यांना वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री यांनी, हरिभाऊ मनमिळावू नेते होते. लोकाभिमुख कामांमुळे त्यांना विधीमंडळ आणि संसदेतही लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावता आली. सहकार आणि राजकीय अशा अनुभवाच्या जोरावर त्यांनी जळगाव जिल्हा आणि रावेर सारख्या परिसरातील विकास‌ कामांसाठी आग्रह धरला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात उणीव निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.