शहाद्यात स्थलांतरीत होणार्‍यांची आरोग्य तपासणी

0

शहादा:नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 19 झाली आहे. त्यातील 9 रुग्ण शहाद्यातील असून शहरातील सात प्रभाग प्रतिबंध क्षेत्रात आहे. शहरातून परराज्यात आणि परजिल्ह्यात जाणार्‍यांची शारिरीक तपासणी करीत त्यांना सदृढ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे, तर संशयितांना त्वरित क्वारंटाईन करण्यात येत आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्या भागात रुग्ण संख्या कमी आहे असा भाग आरेंज झोनमध्ये तर जास्त संख्या असणारा भाग रेड झोन असे विलीगिकरण करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने येथील व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारने स्थलांतरीत मजूरांची घर वापसी करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. शहादा परिसरात मजूरीनिमित्त तसेच लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्यांसाठी घरवापसीचा निर्णय समाधानकारक ठरल्याने घराकडे ओढ लागलेल्यांनी आपल्या घराकडे परत जाण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. गावाकडे परत जाण्यासाठी आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थलांतरीत होणार्‍या सर्वांची आरोग्य तपासणी येथील शासकीय रुग्णालयात केली जात आहे.

नियमांना फासला जातोय हरताळ
आरोग्य तपासणीसाठी स्थलांतरीत सकाळपासून रुग्णालयाबाहेर रांग लावत आहे. तपासणी करतांना सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असतांना तपासणी करण्यासाठी स्थलांतरीत गर्दी करीत असल्याने सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ फासला जात आहेत. तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कनिंग करुन सर्दी, खोकला, ताप असल्याची तपासणी करुन ज्यांना आजाराची कुठलेही लक्षणे नाहीत, अशांना सदृढ असल्याचे प्रमाणपत्र लगेच दिले जात आहेत. तपासणी दरम्यान जे संशयित आढूळन येत आहेत. त्यांना लागलीच क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे.अशांना प्रमाणपत्र न देता काहींना क्वारंटाईन केले जात आहे.