शहाद्यात वाढले मोटारसायकल चोरीचे प्रमाण

0

शहादा। शहरासह परिसरात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून महिन्याभरात दोन डझनहुन अधिक मोटर सायकल चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परवाच मलोणी येथून होंडा शाईन मोटर सायकल चोरट्यांनी लांबवली असून या बाबत शहादा पोलिसांत गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.

आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याची शक्यता
शहरासह ग्रामीण भागात मोटारसायकल चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू असून या चोरीचा सञात अंतरराज्य टोळी सक्रीय आहे. शहादा परीसर हा मध्य प्रदेश व गुजरात या सिमा लगत असुन चोरांना पसार होण्यास सहज फावत आहे. सीमावर्ती भागात पोलीसांची गस्ती लावल्यास मोटर सायकल चोरीस आळा बसेल व मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट सापडू शकतात असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अनेक तक्रारी दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार अशी की,जाकीर जागिर मन्सूरी रा.मलोणी ता.शहादा या इसमाची होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल क्र.ॠग19झ 2584 हि मोटर सायकल घरासमोरील अंगनातुन अज्ञात चोरट्यांनी राञी अंधाराचा फायदा घेउन चोरीला नेली. या बाबत जाकीर मन्सुरी यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवलदार सनिल पाडवी करीत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यात पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.